Happy Doctors & CA Day: तुळशीबागेत डॉक्टर आणि सीए यांचा केला विशेष सन्मान

पुणे : आपल्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून, त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त डॉक्टर व सीए यांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंदिरासमोर करण्यात आला. डॉक्टरी पेशाद्वारे समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असताना समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी मनापासून काम करणार्या डॉक्टरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ, श्री तुळशीबाग पतसंस्था, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि लायन्स क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्या वतीने डॉक्टर आणि सीए यांच्या सन्मानसोहळ्याचे आयोजन तुळशीबागेत करण्यात आले होते. यावेळी तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, संजय मुनोत, श्री देव, नितीन पंडित, लायन्स क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचे अध्यक्ष जीवन हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योती तोष्णीवाल, डॉ.संजीव खुर्द, डॉ.साधना खुर्द, डॉ.अभिजीत सोनावणे, डॉ. मनीषा सोनावणे, डॉ. सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.शेखर कुलकर्णी, डॉ.अंजली करी, डॉ.कीर्ती नांदेडकर, डॉ.अभिजीत फडणीस यांसह सीए स्वप्नील बचुटे, सुरेश मेहता, चंद्रशेखर लुणीया, नारायण सारडा यांना गौरविण्यात आले.