ताज्या बातम्यापुणे

60 हजार द्या प्रमाणपत्र घ्या! पुण्यात दहावी-बारावी बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस

पुणे | शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादाय घटना समोर आली आहे. चक्क बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राचा घोटाळा पुण्यात उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट वेबसाईट तयार करून त्यावरून 700 हून अधिक जणांना प्रमाणपत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे. यात दहावी, बारावी पासच्या प्रमाणपत्रांचा समावेश होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून या रॅकेटमधील मुख्य आरोपी हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत.

पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती. दरम्यान, दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत कृष्णा सोनाजी गिरी (छत्रपती संभाजी नगर), अल्ताफ शेख (धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. तर टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये