ताज्या बातम्यामुंबई

उर्फीची तक्रार… अन् महिला आयोगाचे थेट पोलीस आयुक्तांना आदेश

मुंबई | स्वतःच्या फॅशन सेन्स मुळे चर्चेत आलेली मॉडेल उर्फी जावेद ( Urfi Javed ) हिने आपल्या जीवास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. उर्फी जावेदने यांसदर्भात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी भीती उर्फी जावेदने व्यक्त केली आहे. महिला आयोगाने देखील उर्फी जावेदच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली आहे.

याप्रकरणी महिला आयोगाने थेट मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवण्यात यावा, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.

उर्फी जावेदची तक्रार काय आहे ?

महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असं उर्फी जावेदने तक्रारीत म्हटलं आहे.

महिला आयोगाचे आदेश काय?

भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा. अशा सूचना राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये