संसदेतील कॉंग्रेसच्या महागाई विरोधातील आंदोलनावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : १८ तारखेपासून संसदेचे सुरु झालेले पावसाळी (Monsoon Session)अधिवेशन अजूनही ठप्प आहे. आजही अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सभापतींनी चार कॉंग्रेस खासदारांना आज निलंबित केले आहे. त्या खासदारांकडून महागाई विरोधात पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कॉंग्रेस खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई आणि तेलाच्या वाढत्या किमतीवर बोलावे अशी मागणी सतत केली जात आहे. दरम्यान, यावर नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाला देशापेक्षा आपलं राजकीय हित महत्वाचं आहे. अशी टीका मोदींनी केली आहे. समाजवादी पक्षाचे माजी राज्यसभा खासदार हरमोहन सिंग यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ते कार्यक्रमात बोलत होते.
विरोधकांमुळे देशाच्या विकासात अडथला निर्माण होत आहे. त्यांच्या काळात ते कसलेली निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यामुळे असता सत्तेत असलेल्या सरकारला अडथळे निर्माण करत आहेत. अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.