पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

विद्यार्थ्यांनी जवानांसोबत साजरा केला कारगिल दिन

देशभक्तीपर मोलाचे केले मार्गदर्शन

पुणे ः विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजावी व देशभक्तीचे धडे त्यांना मिळावे यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच आजही कारगिल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आपल्या खर्‍याखुर्‍या हीरोंना भेटण्याची संधी मिळाली.

सिग्नेटच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली. विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. जणूकाय तुम्ही जे देशासाठी करता त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या कार्याला व कर्तृत्वाला सलाम हेच त्यांना यातून दर्शवायचे होते.

SRPF च्या गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. असिस्टंट कमांडर दिलीप खेडेकर सर यांचा सत्कार शाळेच्या संचालिका सौ. शीतल टाक मॅडम यांनी केला. सौ.कल्पना निलाखे मॅडम यांनी आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

जे.एस.पी.एम. हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत सर, श्री व्ही. बुगडे सर, शाळेच्या संचालिका सौ.शीतल टाक, प्राचार्या सौ. कल्पना निलाखे, उपप्राचार्य सौ.काकोली महातो, शाळेचे पर्यवेक्षक श्रीमती संगीता पाटील, रमा कापडी व शिक्षक कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये