ताज्या बातम्यामनोरंजन

‘तुला पाहते रे’ नंतर सुबोध भावे ‘या’ कार्यक्रमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई | Subodh Bhave’s New Program – अभिनेता सुबोध भावे हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आभिनेता म्हणून ओळखला जातो. तसंच तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. आता सुबोध भावे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘तुला पाहते रे’ या प्रसिद्ध ठरलेल्या मालिकेनंतर आता तो एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच संदर्भातली एक पोस्ट त्याने सुबोधने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुबोध भावे लवकरच एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘बस बाई बस’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात सुबोध सुत्रसंचालन करणार आहे. येत्या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सुबोधने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने आगामी मालिकेबद्दलचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. तसंच या पोस्टला त्यानं हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

“हे झी मराठीवाले मला वेगवेगळ्या वाहनातून लई फिरवतात राव, “कुलवधू” ला घोड्यावरून एन्ट्री, “तुला पाहते रे” ला विमान आणि आता “बस बाई बस ” च्या वेळेस प्रत्यक्ष बस आणि या प्रवासात मी एकटा नाही तर सोबतीला सर्वसामान्य गृहिणीच प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील 5 महिला आणि जिच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत ती एक सेलिब्रिटी महिला. आता बोला…..आज मुंबईत प्रत्यक्ष बस मध्ये या कार्यक्रमा संदर्भात पत्रकार मित्र – मैत्रिणींशी गप्पा झाल्या. थोडक्यात काय तर 29 जुलै पासून तुमचं मनोरंजन करायला आम्ही सगळे येतोय. 29 जुलै पासून दर शुक्र आणि शनि. रात्री 9.30 वाजता. फक्त झी मराठीवर”, असं सुबोध भावेनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये