ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

तोडफोड करत मनसेला सोडले, भुजबळांना नडले, आता मातोश्रीला भिडले, वाचा ‘या’ बंडखोर आमदारची कारकीर्द!

नाशिक : (Suhas kande On Aditya Thakceray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारलं अन् राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडली. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये एक नाव सुहास कांदे यांचे आहे. 2005 मध्ये स्थापन झालेल्या मनसेमधून राजकीय जीवनाची सुरुवात केलेल्या कांदे यांनी एकघ्या दोन वर्षात मनसेला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी २००८ ला राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्वतः वंजारी असल्याने त्यांनी वंजारी मतदार जास्त असलेल्या नांदगाव मतदारसंघात एंट्री केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांना विजयी करण्यामध्ये कांदे यांचं मोठं योगदाना होतं.

काही कारणांमुळं छगन भुजबळांसोबत खटके उडाले आणि तिथून पुढे कांदे विरुद्ध भुजबळ असा राजकीय संघर्ष नाशिकच्या राजकारणात पहायाला मिळाला. सत्तेत असलेल्या भुजबळांकडून कांदे यांची चौफेर नाकेबंदी झाल्यानं त्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, पंजक भुजबळ यांच्याकडून थोड्या फरकानं त्यांचा पराभव झाला. याच पराभावाचा वचपा त्यांनी 2019 च्या विधानसभेत घेतला.

मनसेतून राजकारणाची सुरुवात केलेले सुहास कांदे त्यांच्या तोडफोड राजकारणासाठी ओळखले जातात, तर सत्तेत असलेल्या भुजबळांना अनेक वर्षे ते नडले आहेत. आणि आता हेच सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भिडतायत. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना माझं काय चुकलं म्हणत खडे सवाल केलेत. एकेकाळी संजय राऊतांच्याही जवळ असणारे सुहास कांदे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले, लोकांमध्ये मिसळले आणि आमदार झाले. मात्र, मातोश्रीला भिडलेल्या कांदेंना आगामी निवडणुकांत काय पदरी पडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये