क्रीडासिटी अपडेट्स
सुनील हांडा यांची पूना क्लबच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : माजी राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सुनील हांडा यांची पूना क्लब लिमिटेडच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत तीन उपाध्यक्ष आणि सहा समिती सदस्यांचीही निवड केली.
पुण्यात क्रिकेटचे मैदान, टेनिस, स्क्वॅश आणि क्यू स्पोर्ट्ससह इतर अनेक खेळांच्या पायाभूत सुविधा आहेत. क्लबचे १८-होल चॅम्पियनशिप गोल्फ कोर्स देखील आहे.
नवीन व्यवस्थापकीय समिती :
अध्यक्ष : सुनील हांडा (१६०४) उपाध्यक्ष : गौरव गाढोक (१०५५), मनीष मेहता (९२२), शशांक हळबे (५३५); समिती सदस्य : आदित्य कानिटकर (२०६१), पंकज शहा (१७८०), अमित परमार (१५६१), रोहन पुसाळकर (१४०९), कु. प्रिया जैन (१३६२), अभिषेक बोके (१२४३).