ताज्या बातम्यारणधुमाळी

“फडणवीस आपसे ये उम्मीद नही थी…”, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

पुणे | Supriya Sule On Devendra Fadnavis – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. मात्र, काल (20 नोव्हेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सुप्रिया सुळे पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “फडणवीस आपसे ये उम्मीद नही थी असं म्हणत, दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“माझी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. राज्यपाल यांच्यावर टीका करणं आपली संस्कृती नाही, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, नवले ब्रिज अपघाताबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. सर्व्हिस रोड झाले नाही, क्रोनिक पाॅईंट झाले, उतार आहे. या रस्त्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. आज पुणे महापालिका आयुक्त सगळी टीम यासंदर्भात बैठक घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये