राज ठाकरेंनी जाहीर केला मोठा निर्णय; म्हणाले, “मी कुठल्याही प्रकारचा धोका…”

मुंबई | Raj Thackeray Announce Big Decision – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठ आणि चर्चांपासून दूर आहेत. राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ते आवश्यक ती काळजी घेत आहेत. तसंच १४ जून या दिवशी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन केलं आहे. एका ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळेत करता आली नाही. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही.”
“माझ्या शस्त्रक्रियेला आधीच विलंब झाला आहे. जर या वाढदिवशी बाहेरून काही लोक मला भेटले आणि त्यांच्याशी माझा संपर्क आल्याने पुन्हा कोविड किंवा काही त्रास झाला तर पुन्हा ही शस्त्रक्रिया लांबवावी लागेल. त्यामुळे यंदा मला कोणीही भेटायला येऊ नका. कारण शस्त्रक्रिया किती काळ लांबवायची यालाही मर्यादा आहेत. आपण सर्वजण जिथे आहात तिथेच राहा आणि शुभेच्छा द्या. शस्त्रक्रियेनंतर मी तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन. पण सध्या मी कुठल्याही प्रकारचा धोक पत्करू इच्छित नाही, त्यामुळे १४ तारखेला वाढदिवशी मी कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी घोषणा राज यांनी ट्विटरवरून केली आहे.