“…त्यामुळे फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचं असतं”, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र
मुंबई | Supriya Sule – सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली असून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. तर आता पक्षफुटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काहीही करून सत्तेत यायचं असतं, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत. काहीवेळा हे प्रयत्न अपयशी ठरले तर काहीवेळा ते यशस्वी ठरले. पक्ष फोडणे, साम-दाम-दंड-भेद हे फडणवीसांचे शब्द आहेत. त्यामुळे त्यांना काहीही करून सत्तेत यायचं असतं, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
राष्ट्रवादीत अजिबात फूट पडलेली नाहीये. शऱद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. पण आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.