‘मला तेंडुलकर आणि बच्चन असल्याचा…’; भारताने केलेल्या स्वागतानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॅान्सन हे सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांचे भारतात जोरदार स्वागत केलं जातंय. या स्वागताने भारवलेल्या बोरिस जॉन्सन यांनी आपल्याला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येतोय असं म्हटलं आहे. तसंच देशवासियांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार देखील व्यक्त केले आहेत.
यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, “भारताने केलेल्या स्वागताबद्दल मी भारतीय नागरिकांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. इथल्या लोकांनी आपले आपुलकीने स्वागत केलं. अशा प्रकारचे स्वागत मी या आधी कधीच अनुभवलं नव्हतं. सर्वत्र माझे होर्डिंग्ज पाहिल्यानंतर मला आता सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येतो.”
तसेच बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हा खास दोस्त असा केला आहे. तसंच भारत आणि ब्रिटनमध्ये खास संबंध असल्याचं देखील ते म्हणाले.