ताज्या बातम्यामनोरंजन

जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर सुरज पांचोलीच्या इन्स्टा स्टोरीनं वेधलं लक्ष; म्हणाला…

मुंबई | Sooraj Pancholi – बाॅलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणावर (Jiah Khan Suicide Case) विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सीबीआय कोर्टानं जिया खानचा बाॅयफ्रेंड सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सूरज पांचोलीनं एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. “सत्याचा नेहमी विजय होतो”, असं सूरजनं त्याच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे. तसंच त्याच्या या स्टोरीनं सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

image 5

जिया खान आत्महत्या प्रकरणाची सुनावणी विशेष सीबीआय न्यायालयात पूर्ण झाली होती. तसंच 20 एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठानं दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. तर आज (28 एप्रिल) या प्रकरणी न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणाचा निकाल तब्बल 10 वर्षांनी लागला असून यामध्ये सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “पुराव्यांच्या कमतरतेमुळे सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालं आहे”, असं विशेष सीबीआय न्यायालयानं निर्णय जाहीर करताना सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये