‘अभिनव’चा ‘सुरमयी योगा’; ‘योग वसे जेथे, आरोग्य वसे तेथे’
पुणे : लहान मुलांच्या मनावर व्यायामाचा ठसा उमटविण्यासाठी २१ जून ‘ जागतिक योग दिन’ तसेच ‘ जागतिक संगीत दिन’ याचे औचित्य साधून आदर्श शिक्षण मंडळींचे‘ अभिनव विद्यालय पूर्व प्रा.म.मा शाळेत मुख्याध्यापिका शुभदा कुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरमयी योग दिन’ साजरा करण्यात आला. वृंदा बाम व विष्णुप्रिया शेवडे यांच्याबरोबर मुलांनी ओंकार आणि प्रार्थना म्हणून योगाची सुरुवात केली.
जलदगतीचे गाणे लावून मुलांनी व्यायामपूर्व हालचाली केल्या. तिलक कामोद या शास्त्रीय संगीताची धून लावून काही उभी आसने, तर तराणा हा गीत प्रकार स्वतः वृंदाताईंनी गाऊन मुलांनी बैठी आसने, तसेच हालचालींचे वेगवेगळे प्रकार केले. स्वर अलंकारावर शरणागत मुद्रा, भ्रामरी हे योग प्रकार घेऊन प्रार्थनेने योगदिनाची सांगता झाली. शाळेतील ताई तसेच मुलांनी हा आगळावेगळा ‘सुरमयी योगा’ यामध्ये सहभाग घेतला.