ताज्या बातम्यारणधुमाळी

भाजपचे ‘हे’ माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | Vinayak Raut – सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. याच दरम्यान, शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे (BJP) माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) हे शिवसेनेमध्ये (Shivsena) येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावेळी विनायक राऊत म्हणाले, “संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छूक आहेत. तसंच त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. देशमुख यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. ते शुक्रवारी देखील शिवसेना भवनला आले होते”, असा दावा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, एका बाजूला शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात जात असताना दुसरीकडे मात्र आता विनायक राऊत यांनी देशमुख हे शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये