किवींकडून झालेल्या पराभवावर सूर्या म्हणतो, हा खेळ असाच; सूर्य उद्या पुन्हा उगवणार…

रांची : (Suryakumar Yadav Speak On T20) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव केला. यामुळे वनडे मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणाऱ्या भारताला पहिल्यात सामन्यात झटका बसला. पहिल्या वनडे सामन्यात भारताने अनेक चुका केल्या मात्र काही चांगल्या खेळी देखील झाल्या आहेत. विशेष म्हणजे वनडे मालिकेत काळ्या ढगात लुप्त झालेला सूर्य टी 20 मालिकेत पुन्हा तळपणार अशी आशा निर्माण झाली आहे.
भारताचा 360 डीग्री खेळाडू सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली. भारताची सुरूवात खराब झाली असताना सूर्यकुमार यादवने कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीने डावा सावरला होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली होती. हे दोघे फलंदाजी करत असताना भारत सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र सूर्या आणि पांड्या पाठोपाठ बाद झाले अन् भारताच्या विजयाची आशी मावळली.
विशेष म्हणजे वनडे मालिकेत सूर्यकुमारच्या बॅटमधून उत्साहवर्धक अशी खेळी आली नव्हती. त्यामुळे सूर्याच्या फॉर्मला ग्रहण लागले का अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र टी 20 मालिका सुरू होताच सूर्याने आपले तेज दाखवून दिले. याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘वनडे मालिका मला हवी होती तशी गेली नाही. मात्र हे ठिक आहे हा खेळ असाच आहे. वनडे मध्ये उद्या सूर्य पुन्हा उगवणार.’