“शिंदे गटाचे २० आमदार भाजपमध्ये जाणार?”, फडणवीसांच्या ‘ट्रॅप’ची सुषमा अंधारेंकडून पोलखोल!

मुंबई : (Sushama Andhare On Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीमुळे शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद काही गेल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी शिंदे गटासह भाजपला (BJP) लक्ष केलं आहे. त्या म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे 40 पैकी 20 आमदार भाजपमध्ये सामील झाले तर नवल वाटायला नको, हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) ट्रॅप असल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री शिंदेंना समजत नाही, भाजप आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे गटाचे 20 आमदार फोडून भाजला फडणवीसांना स्वतःचा पक्ष मोठा करायचा आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदावर विराजमान होण्यासाठी थेट नरेंद्र मोदींना (Narendra Modi) देखील आव्हान देतील अशी खोचक टिप्पणी अंधारे यांनी केली आहे.
जुन्या व्हिडिओवरुन त्या म्हणाल्या, “सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ते भाजपने माझ्याविरोधात जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. मुळात जो सच्चा वारकारी आहे, तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यापेक्षा चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारेल किंवा तर्काच्या आधारे चर्चा करण्याचं आव्हान देईल. पण तो अशी अमंगल आणि अभद्र भाषा वापरणार नाही. मुळात माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार किंवा वारकरी हे भागवत संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. त्यामुळे भागवत संप्रदाय वेगळा आहे आणि मोहन भागवत संप्रदाय वेगळा आहे.” असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.