ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्ररणधुमाळी

“भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण…”, नवनीत राणांच्या ‘त्या’ गाण्यावरून सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

बीड | Sushama Andhare – शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून वाद सुरू आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणनं भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यावरूनच आता सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) खासदार नवनीत राणा यांच्या एका गाण्याची आठवण करून दिली आहे. नवनीत राणांनी त्यांच्या एका गाण्यात भगव्या रंगाची साडी घालून डान्स केला होता. यावरून आता सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्या बीड येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होत्या.

“सध्या ‘पठाण’ या चित्रपटातील एका गाण्यावरून चांगलाच वाद सुरू आहे. दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे. त्यामुळे त्या गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केलाय. मात्र, नवनीत आक्काच्या त्या गाण्याची चर्चा का होत नाही बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख तांबोळी असं काही नाही म्हणून का?”, असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) नवनीत राणांवर हल्लाबोल केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “माफ करा पण मी जास्त स्पष्ट आहे. कारण मला पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणं जास्त योग्य वाटतं. ‘क्युकी मेरा जमीर जिंदा है, मै मुर्दा नही हू’, असं म्हणत सुषमा अंधारेंनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन दिलं. तसंच विरोधकांनी मागच्या दोन अडीच वर्षात चुकीचं नरेटीव्ह लोकांपुढे मांडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अडीच वर्ष घराबाहेर पडलेच नाहीत, असं सांगितलं गेलं. पण यात तथ्य आहे का? हे कुणी तपासलंच नाही. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) अडीच वर्षामधली दोन वर्ष कोरोना काळात गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडायला सर्वांवरच बंधनं होती”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये