ताज्या बातम्यारणधुमाळी

सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मराठा नेतृत्वाकडे निर्णय क्षमता नसते हे…”

मुंबई | Sushma Andhare On Devendra Fadnavis – शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे-भाजप सरकार गुजरातपुढे दबून चालतं. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना प्रत्येकवेळी दिल्लीला जावून विचारावं लागतं. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीस बोलून देत नाहीत, माईक काढून घेतात, चिठ्ठ्या पुरवतात, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. “मराठा नेतृत्वाकडे निर्णय क्षमता नसते हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, भाजप आणि आरएसएसकडून सुरू आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी लोकं लागतात. येथील बहुजन लोकांनी महाराष्ट्राचं नेतृत्वपद आणि मुख्यमंत्रीपद घेण्याची कुवत नाही. हे दाखवण्यासाठी माईक काढणे, चिठ्ठ्या पुरवणे अथवा गिरीश महाजन यांनी काहीतरी बोलणे हे ठरवून केलं जात आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे सुषमा अंधारेंनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावरही निशाणा साधला. “लोक उद्योगांवरून प्रश्न विचारतील म्हणून शेलार जाणीवपूर्वक हिंदू मुस्लीम कार्ड खेळत आहेत. त्यामुळे लोकांनी प्रश्च विचारायच्या आधीच त्यांच्या डोक्यात धर्माचं खूळ घालण्याचा प्रयत्न शेलार यांच्याकडून सुरु आहे,” अशी टीका अंधारेंनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये