सुश्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका; इंस्टाग्रामवर माहिती देत केला खुलासा

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिला काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला होता असा खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं केलेल्या या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली असून तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
याबद्दल तिने इंस्टाग्रामवर माहिती दिल्यानंतर तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सने लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे. तुमचं ह्रदय आनंदी आणि धैर्यवान ठेवा. इंस्टावर सुश्मिता सेननं म्हंटलंय, दोन दिवसांपूर्वी मला ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयरोगतज्ज्ञांनी हे कंफन्म केलं की, हा मोठा झटका होता. योग्यवेळी योग्य उपचार केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. त्यातून मी बचावली आहे, ही गूड न्यूज देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. गॉड इज ग्रेट असा हॅशटॅग तिने दिला. सुश्मिताच्या चाहत्यांनी लवकर बरी होण्याची प्रार्थना केली.