हार्दिक पांड्याच्या तुफान खेळीने इंग्लंडसमोर १६९ धावांचं आव्हान; भारत-पाक फायनल होईल?
T20WorldCup2022 : टी २० वर्ल्डकपचा आजचा भारत विरुध्द इंग्लंड (Ind vs Eng) सामना खूपच महत्वपूर्ण आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने तुफान खेळी खेळत इंग्लंडसमोर १६९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. (icct20worldcup2022) सामन्याच्या सुरुवातीलाच के एल राहुल, सुर्याकुमार यादव, पंत कमी धावांतच बाध झाले. त्यामुळे संघावर दबाव होता. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महत्वाचं म्हणजे हार्दिक पांड्या यांनी धीर ठेवत इंग्लंड समोर मोठं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे.
विराट कोहलीने अर्धशतकी खेळी खेळली तर हार्दिक पांड्याने फक्त ३३ चेंडूंत ५ षटकार आणि ४ चौकार मारत ६३ धावा घेतल्या आहेत. रोहित शर्मा २७ धावा घेऊ शकला.
दरम्यान, भारताने हा सामना जिंकला तर फायनल साठी भारत विरुध्द पाकिस्तान असा जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे. अनेक क्रिकेटप्रमींकडून भारत आणि पाकिस्तानात शेवटचा सामना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.