ताज्या बातम्यापुणे

पुणे जिल्ह्यातून चार अट्टल गुन्हेगार १ वर्षासाठी तडीपार 

रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा, म्हणून येरवडा पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन तीन गुन्हेगारांवर विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून ०१ वर्षाकरीता तडीपार आदेश दिले आहेत.

पुणे शहर पोलीस ठाण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या तसेच संघटित गुन्हेगारी कारवायांमुळे रेकॉर्डवर आलेल्या चार अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

वनराज महेंद्र जाधव (वय –२१), यशराज आनंद इंगळे (वय – २३), व हिमालय ऊर्फ गोलु मिटु बिस्ट (वय -२१ ), रा. तिघेही, लक्ष्मीनगर पोलीस चौकीच्या मागे लक्ष्मीनगर येरवडा, पुणे व मयुर विष्णु गुंजाळ (वय २६रा. स. नं. १०, वडारवस्ती, शनिआळी येरवडा असे १ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४ मधील येरवडा पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावरील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे खुनशी व धोकादायक प्रवृत्तीचे असुन, त्यांच्या विरुद्ध खून, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, तोडफोड करणे, जवळ घातक हत्यार बाळगणे, शिवीगाळ करणे, हाताने मारहाण करणे, यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे मयुर विष्णु गुंजाळ याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे १) कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढील काळात देखील येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर निगराणी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे, महीला पोलीस अंमलदार मोनीका पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये