अखेर लोणावळ्यात गोंधळ घालणाऱ्या माकडाला पकडण्यात वनविभागाला यश

पुणे : गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या जवळ असलेल्या लोणावळा परिसरात एका माकडाने गोंधळ घातला होता. तेथे येणाऱ्या पर्यटकांना आणि नागरिकांना चावा घेतं असल्याने वनविभागाकडून त्या माकडाला पडकण्याचा प्रयत्न केला जात होता . आता या माकडाला पकडण्यात वनविभाला यश आलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमधील भीतीचं वातावरण कमी झालेलं आहे.
लोणावळा-खंडाळा परिसरातील गिरीजा हॉटेल, आयसीआयसीआय लर्निग होम, दगडी बंगला या परिसरात हे माकड अक्षरशः तेथील सुरक्षा रक्षक, पर्यटक आणि दुचाकी चालकांवर हल्ला चढवत ,त्यांना खाली पाडून चावा घेत होतं . अशा प्रकारच्या २७ घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तर अनेकांना गंभीर दुखापत झालेली आहे. अखेर, रविवारी शिवदुर्ग टीम लोणावळा आणि वनविभागाने माकडाला पकडलं असल्यामुळे पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.