मनोरंजन

सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर शेअर केली ‘ही’ हटके पोस्ट

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच तीला बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत येत असते. सई ही लवकरच ‘पेर पुराण’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या निमित्ताने नुकतंच तिने एक हटके पोस्ट शेअर केली आहे.

सईने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट आगामी पेट पुराण या वेबसीरीजची आहे. या पोस्टमध्ये तिने एका मांजरीचा फोटो शेअर केला आहे. यात ती मांजर झोपली असून तिचे नाक दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन देखील दिले आहे.

‘माझी pink नाकाची सुंदरी ! बकूळा aka बकू !!’, असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे. सईचा हा फोटो आणि तिचं कॅप्शन सध्या चांगलंच चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या हटके पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती देखील दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये