ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

नरेंद्र मोदीजी हटाव हाच एकमेव अजेंडा : फडणवीस

मुंबई | केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊनच ते पक्ष एकत्र आले आहेत. मात्र अशाप्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत ३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

इंडिया या विरोधकांच्या पक्षांची बैठक आज आणि उद्या पार पडणार आहे. या बैठकीसाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत. राहुल गांधी हे काही वेळातच पत्रकारांशी संवादही साधणार आहेत. तर मागच्या काही दिवसांपासून इंडियाच्या बैठकीची चर्चा आहे. आज सकाळी तर संजय राऊत यांनी इंडिया को हराना मुश्किल ही नहीं नामुमकीन है असंही म्हटलं आहे. अशात या बैठकीवर आणि जमलेल्या सगळ्या पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

मोदींजीना हटवायचं एवढा एकच अजेंडा या पक्षांपुढे आहे. पण ते शक्य होणार नाही, कारण लोकांच्या मनात मोदी आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेवटी मोदीजी लोकांच्या मनात, त्यांच्या कार्यामुळे, नेतृत्वामुळे आणि देशाला प्रगतिपथावर नेल्यामुळे आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला त्यामुळेच मोदीजी सामान्यांच्या मनात आहेत. आपला विचार न करता सर्वस्व देशाला देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्यामुळे मोदीजी लोकांच्या मनात आहेत. या ठिकाणी जे पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत ते काही देशाचा विचार करून नाही तर आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहेत ही दुकानं कशी वाचवायची यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत.

आजच पाच पार्ट्यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. इंडियाचे पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत. यांनी ठरवला तरीही तो जनतेला पटला पाहिजे. यांचा कुठलाही उमेदवार जनतेलाही पटत नाही. बॅनरबाजी करून, एकत्र येऊन आणि घोषणाबाजी करून आपला टाइमपास ते करत आहेत. मात्र त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये