अखेर ठरलं! ‘पठाण’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार लाँच

मुंबई | Pathaan Trailer – गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरची (Pathaan Trailer) उत्सुकतेनं वाट पाहत होते. मात्र, आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
“तारीख लिहून ठेवा. 10 जानेवारी 2023 रोजी ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर चर्चेत असतानाच ट्रेलर 10 तारखेला लाँच केला जाईल. चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 37 सेकंदाचा असेल. तसंच तो अॅक्शन सीक्वेन्स, संगीत आणि हिरोइझमने भरलेला आहे,” अशी माहिती ‘पिंकव्हिला’ने दिली आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही ट्विट केलं आहे.
दरम्यान, शाहरूख खानचे चाहते पठाणचा टीझर पाहिल्यानंतर त्याचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर ट्रेलर 10 जानेवारीला लाँच होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. शाहरूख खान या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय.