रश्मिका मंदानानं अल्लू अर्जुनला दिल्या हटके स्टाईलने शुभेच्छा; म्हणाली, “माय पुष्पराज…”

मुंबई | Rashmika Mandanna – आज (8 एप्रिल) दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) वाढदिवस आहे. अल्लू अर्जुन त्याचा 41 वा वाढदिवस (Allu Arjun Birthday) साजरा करत आहे. तसंच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री, नॅशनल क्रश रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) अल्लू अर्जुनला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
रश्मिका मंदानानं अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं अल्लूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे छान पोज देताना दिसत आहेत. तसंच हा फोटो शेअर करत रश्मिकानं अल्लू अर्जुनला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
रश्मिकानं लिहिलंं आहे की, “माझा पुष्पराज, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण जग तुला पुन्हा पुष्पाच्या रूपात पाहण्यासाठी आतुर आहे आणि मला आशा आहे की ते तुझ्यावर खूप प्रेम करतील. तुम्हाला खूप सारं प्रेम सर.”

तसंच अल्लू अर्जुननंही रश्मिकाची ही पोस्ट री-शेअर केली आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “धन्यवाद माझी श्रीवल्ली.”

दरम्यान, अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या पार्टनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. तसंच आता ‘पुष्पा 2’चा (Pushpa 2) थरारक व्हिडीओ समोर आला आहे. पुष्पा 2 चित्रपटाचा एक व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचा किलर लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा व्हिडीओ टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांना ‘पुष्पा 2’ चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.