Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा … ‘ह्या’ राज्यांमध्ये हाय अलर्ट

IMD Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. येत्या दिवसांत सर्वच जिल्ह्यांत पावसाची रिपरिप बघायला मिळणार आहे. सोबतच, कोकणातच देखील पावसाचा जोर वाढणार असून शेतकऱ्यांची चिंता मिटण्याची असल्याची आशा आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात पुढील पाच दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असून १7 जुलैपासून पुन्हा तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक केली आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

पुढील पाच दिवस जरी पावसाचा अंदाज असला तरी मागील दीड महिन्यात राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट बघायला मिळत आहे.राज्यात 1 जून ते 15 जुलैपर्यंत 350 मिमीपैकी 276 मिमी पाऊस झाला आहे. ज्यात संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर सध्या 21 टक्के तूट बघायला मिळत आहे. पुढील 15 दिवस पावसाळी असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. 18 जुलैपासून मुंबई आणि उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील येत्या दिवसात पावसाचा जोर वाढेल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये