ताज्या बातम्यादेश - विदेश

अमरोहामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसवर अंदाधुंद गोळीबार, पोलिसांचा तपास सुरु

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांचा  शोध घेत आहेत. मात्र, बसचालकाच्या हुशारीमुळे कोणताही अपघात झाला नाही. चालकाने बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात नेली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास एसआरएस स्कूलची मिनी बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी बसमध्ये अनेक मुले प्रवास करत होती. त्यानंतर अचानक दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

गोळीबाराचा आवाज ऐकताच बसमध्ये बसलेल्या मुलांनी भीतीने रडणे आणि ओरडणे सुरू केले. मुलांच्या जीवाला धोका असल्याचे ड्रायव्हरला समजले. अशात गोळीबाराची माहिती मिळताच चालकाने बस तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात नेली. त्यामुळेच चालक आणि मुले पूर्णपणे सुरक्षित आहे

भाजप नेत्याची शाळा
ही शाळा अमरोहा भाजप नेते आणि ब्लॉक प्रमुख वीरेंद्र सिंह यांची आहे. याच स्कूल बसवर हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबत पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये