“अध्यक्ष उन्हात अन् मॅडमसाठी…”, भाजप आमदाराचं ट्विट चर्चेत

मुंबई | Atul Bhatkhalkar – भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांचं एक ट्विट चांगलंच चर्चेत आहे. त्यांनी या ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) दिसत आहेत. हे दोघं राष्ट्रध्वजासमोर उभे आहेत. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे उन्हात उभे आहेत तर सोनिया गांधींच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली आहे. त्यावरून अतुल भातखळकर यांनी एक खोचक ट्विट केलं आहे.
अतुल भातखळकर यांनी मल्लिकार्तुन खर्गे आणि सोनिया गांधी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “राजाचं घर उन्हात…काँग्रेस संस्कृतीची दिवाळखोरी, अध्यक्ष उन्हात नि मॅडमसाठी छत्री.” भातखळकर यांनी केलेलं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.
या ट्विटवरून अतुल भातखळकर यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. कारण, सोनिया गांधी या आजारी आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी अशी पोस्ट तुम्ही कशी काय करता? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. तर एका नेटकऱ्यानं भातखळकर तुम्ही आत्मचिंतन करा त्याची तुम्हाला गरज आहे असं म्हटलं आहे.