‘बिचाऱ्याला कुठंही उभं करा दिसतो गरीबच!’ केजरीवालांची KRK नं उडवली खिल्ली

KRK On Arvind Kejriwal : बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मात्र, केआरकेच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर काहींनी त्याच्या सोशल मीडियावरील या ट्टिटवर संताप व्यक्त करत खोचक सवाल केले आहेत.
दरम्यान, कमाल राशिद खाननं ट्विटरवर राघव आणि परिणीती यांच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये राघव-परिणीतीसह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वासर्वे अरविंद केजरीवाल दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत केआरकेनं केजरीवाल यांच्यावर खोचक टीका केली आहे.
त्यानं फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे, आणि याचमुळे त्याच्यावर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. केआरकेनं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. “या माणसाला कुठंही उभं करा तो गरीबच दिसतो.” केजरीवालांनी राघव परिणीतीच्या सोहळ्यात सहभागी होत त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. तुम्हा दोघांची जोडी भलतीच सुंदर दिसते आहे. केआरकेनं मात्र केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यालाही नेटकऱ्यांनी चांगलेच झापलें आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत पण तू कोण आहेस असा प्रश्न विचारला आहे.
राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या साखरपुड्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत अनेक राजकारणातील, समाजकारणातील आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रानं देखील आपल्या लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यामध्ये केलेली वेशभूषा चर्चेत होती.