ताज्या बातम्या

Earthquake in Delhi : भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली पुन्हा हादरली

दिल्ली |  राजधानी दिल्लीसह परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अद्यापपर्यंत किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली आहे याची ठोस माहिती आलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये