ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेना दसरा मेळावा; शिंदे गटाची कुरघोडी अन् मनसेची उडी

मुंबई : (Kirtikumar Shinde On Eknath Shinde) शिवसेनेच्या 55 वर्षाच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला छेत देत शिंदे गटाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता या वादात मनसेने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. आठवडाभरापुर्वी शिवसेनेकडून दादर येथित शिवाजी पार्क या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना अद्याप परवानगी मिळाली नाही.

दरम्यान, आज शिंदे गटातून यावर कुरघोडी करत शिवाजी पार्क या ठिकाणाची निवड करत दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेला परवानगी मागितली आहे. हा वाद सुरु असतानाच आता मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारे एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे. त्यात ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा वारसा चालवता आला नाही. तर हिंदुत्व आणि मराठीच्या रक्षणाचे ज्वलंत विचार मांडण्याची क्षमता शिंदे गटात नाही असे या पत्रात म्हटलं आहे.

हिंदूंची मरगळलेली मने पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राज ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसेच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण हिंदूहृदसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन या पत्रात राज ठाकरे यांना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये