मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण,…

मुंबई : (MC Uddhav Thackeray On Resignation) शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यामुळं उभी फुट पडली आहे. यामुळं ‘मविआ’ विकास आघाची सरकार आडचणीत आले आहे. राज्यातील सर्व राजकीय अस्थिरतेच्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर येऊन पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करणार होते.
दरम्यान, सोमवार दि. २७ रोजी एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. तर बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असा देखील दावा केला होता की, आपण शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडण्यास तयार आहोत. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी मला हे समोरासमोर येऊन सांगावे असे ठाकरे यांनी आवाहन केले होते.
या सर्व गोष्टी लक्षाच घेऊन मुख्यमंत्री ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंना असा टोकाचा निर्णय घेण्यापासून रोखल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखल्याची माहिती समोर आली आहे.