ताज्या बातम्यारणधुमाळी

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोन अनमोल रत्न”

मुंबई | Amruta Fadnavis – झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी अमृता फडणवीस यांना ‘कशी नशिबान थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तसंच आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या 37 दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरुच आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आजही दिल्लीत आहेत. तसंच अमृता फडणवीस यांनी आज (7 ऑगस्ट) फ्रेंडशीप डेच्या औचित्याने  #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं चांगलंच लक्ष वेधलं आहे.

अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ये दोस्ती हम नही तोडेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. सोबत #friendshipday, #friendship, #friends, #sundayvibes, #maharashtra असे हॅशटॅग वापरले आहेत. तसंच त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

https://www.facebook.com/amrutafadnavisofficial/posts/pfbid02UtHVdxFZKtaMEkuRyf9Vu43aZGRdXJhecJsNCnokqGeebzov3qV7Nt9qSZkvPnCRl

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये