“दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा मी…”, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई | Aaditya Thackeray – दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणात (Disha Salian Suicide Case) शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आपलं मौन सोडलं आहे. दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी आपण कुठे होतो याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या दिवशी मी रुग्णालयात होतो. आजोबा (रश्मी ठाकरे यांचे वडील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते त्यामुळे मी रूग्णालयात होते, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईलच, असं ते म्हणाले.
आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. त्यामुळे सरकारला विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकायचं नाहीये, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसंच आमच्यावर कितीही चौकशी लावली तरी आम्ही डगमगणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) यांचे मृत्यू जेव्हा झाले तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरेंचंच नाव का समोर येत आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांच्या नावांच्या चर्चा का होत नाहीत हे समजण्याची गरज आहे, असं नितेश राणे म्हणाले. तसंच जशी श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी (Shraddha Walker Case) आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली तसंच एकदा आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट (Narco Test) करा, पूर्ण सत्य बाहेर येईल, असंही राणे म्हणाले