पंतप्रधान मोदींच्या कुटुंबावर दुःखाचे संकट, भावाच्या कारचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर…

म्हैसूर : (Prime Minister Narendra Modi’s brother’s car accident) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Pralhad Joshi) यांच्या कारचा अपघात (Car Accident) झाला आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथे मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातू प्रवास करत होते. कार दुभाजकाला आदळून हा अपघाता झाला. त्यामुळे मोदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रल्हाद मोदी आपल्या कुटुंबासह बंदीपुरा येथे जात असताना अपघात झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची मर्सिडीज कार दुभाजकावर आदळली. अपघात झाला तेव्हा प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा ताफाही होता. अपघातानंतरचा फोटो समोर आला असून कारच्या पुढील भागाचं नुकसान झाल्याचं दिसत आहे.
अपघातात प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसंच इतरजण किरकोळ जखमी झाले असून त्यांनी म्हैसूर येथील जे एस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.