“50 खोके एकदम ओके’ गद्दारांना टोला अन्…” पोरांचा नादच खुळा, व्हिडीओ तुफान व्हायरल

एकनाथ शिंदे आपण केलेल्या बंडखोरीची नोंद 33 देशांनी घेतली असं ते जाहीर भाषणात मोठ्या गर्वाने सांगत आसतात. मात्र, त्यांनी पक्षासोबत केलेली गद्दारी आता गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. सध्या धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरी केला जात आहे.
दरम्यान, सध्या लहान मुलांच्या धुलीवंदनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी एका मुलाच्या पाठीवर “गद्दार-गद्दार, 50 खोके एकदम Ok” असा मुजकूर लिहिल्याचं दिसून येत आहे. तर इतर “मुले आले रे आले.. गद्दार आले, पन्नास खोके एकदम ओके” अशा घोषणा मोठ्या उत्साहाने देत आसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा आणि पन्नास खोक्याचा प्रश्न ताजा असतानाच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून तुफान पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मोठ्या प्रमाणावर लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
शिंदे गटातील अनेक आमदार-खासदारांना पन्नास खोके, एकदम ओके, गद्दार-गद्दार, बंडखोर यासारख्या घोषणांना सामोरं जावं लागलं आहे. आता तर लहान मुलांमध्ये देखील या घोषणा पोहोचल्या आहेत. ज्या लहाग्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांच्याकडून अशा घोषणा देण्यात आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.