क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

कुलदिप, सिराजच्या माऱ्यापुढं श्रीलंका धारातीर्थी! 40 षटकांत ऑल आऊट, केवळ 216 धावांचं आव्हान

कोलकत्ता : (India Vs Sri Lanka ODI Series 2 nd Match 2023) फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने धमाकेदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत कुलदीप, सिराजने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. त्यांना अन्य गोलंदाजांची चांगली साध मिळाली त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव फक्त २१५ धावांवर संपुष्टात आला.

भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला तगडं आव्हान देण्याच्या हेतूने मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदानात तग धरुन राहता आलं नाही. एक-एक करत 40 षटकांच्या आत सर्व धारातिर्थी पडले. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. नवोदित नुवानिंदू फर्नांडोने शानदार अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी जबरदस्त गोलंदाजी केली.

भारतीय गोलंदाजांनी आज फारच कमाल गोलंदाजी केली. ज्यामुळे 39.4 षटकांतच श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने अवघ्या 5.3 षटकांत 30 धावा देत 3 विकेट्स घेत सर्वात भारी गोलंदाजी केली. याशिवाय उमरान मलिकेने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. एक श्रीलंकेचा गडी धावचितही झाला. ज्यामुळे 215 वर श्रीलंका ऑलआऊट झाली असून आता भारत फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये