कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर, ‘या’ दिवशी होणार मतदान

पुणे | Pune Bypoll Election – पुण्यातील कसबा पेठच्या भाजप (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. तसंच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचंही निधन झालं आहे. त्यामुळे या दोघांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक (Bypoll Election) जाहीर करण्यात आली आहे.
31 जानेवारी रोजी या पोटनिवडणूकीसाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार असून 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. तसंच या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. यानंतर या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक होईल असा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे.