राज ठाकरेंच्या सुरक्षा प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बंगळूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्या राज्यांमध्ये आमची शक्ती कमी आहे त्यापैकी कर्नाटक एक राज्य आहे. येथे जास्त लक्ष द्यावं यादृष्टीने मी सुरुवात केली आहे. मी आणि माझे सहकारी वर्षभर दौरे करत या ठिकाणी पक्षाचं काम वाढवतील,” अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.
“देशात सांप्रदायिक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांच्या सहाकऱ्यांच्या वतीने होत आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. यासोबतच काही राष्ट्रीय प्रश्न आहेत. जसं सांप्रदायिक विचार वाढणं चिंताजनक आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती सामान्य माणासाला त्रासदायक आहे. त्यावरही बोलावं अशी आमची मागणी आहे,” असंही शरद पवार म्हणाले.
पुढे राज ठाकरेंना सुरक्षा देण्यासंबंधी सुरु असेलल्या चर्चेवर ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर ते अयोध्येला जाऊ शकतात, हा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यास हरकत नाही”.