ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार, शिंदे गटाच्या ढालेवार ठाकरे गटाचा पहिला वार!

मुंबई : (Ambadas Danve On Eknath Shinde Group) शिंदे गटाला काल केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर आज ढाल तलवार चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमचं चिन्ह एकदम परफेक्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने मात्र ढाल तलावर चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर खोचक टिप्पणी केलीये. भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार मिंधे गटाला मिळाली, असाच या चिन्हातून बोध होतो, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी काल मशाल हे पक्षचिन्ह देण्यात आलं होतं, तर एकनाथ शिंदे यांनी सुचवलेली तिन्ही चिन्हे काल आयोगाने बाद ठरवत नवीन तीन पर्याय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हासाठी तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही चिन्हे सुचवली. यातील ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षासाठी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये