“दुर्दैव… महाराष्ट्रात केरला स्टोरी”; दिग्दर्शक केदार शिंदेंनी केली खंत व्यक्त

मुंबई | द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अनेक मोठ्या वादांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला. सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. अनेकांनी तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच कोर्टामध्ये धाव घेतल्या. मात्र, शेवटी अनेक वादांनंतर हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी सिनेमावर बंंदी घालण्यात यावी अशी विनंती केली असताना, महाराष्ट्रात मात्र काही नेते हा सिनेमा फुकट दाखवत असल्याचं मराठी दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.
आतापर्यंत अनेक हिंदी कलाकारांनी या सिनेमावर भाष्य केलं. पण आता प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती पाहत त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. याआधी कंगना रणौत आणि शरद पोंक्षे यांनीही या सिनेमावर आपलं मत दिलं होतं. पण आता केदार यांनी सिनेमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नसून, महाराष्ट्रातील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.