
मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही. शिक्षणाच्या परिक्षेत अपयश आलं म्हणून, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन आणि वेगळे प्रयोग करुन जीवनाच्या परीक्षेत टॉपर असतात.
दरम्यान, दहावी बारावीत नापास झाल्यानंतरही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या काही उदाहरणांवरुन आपण ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो. मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांचं नाव यात प्रमुख्याने घ्याने लागेल. काही दिवसापुर्वी मंजुळे यांनी स्वत: एक फेसबुक पोस्ट करत त्यावर भाष्य केलं होतं. मंजुळेंनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, मी दहावीत दोनदा नापास झालो होतो.
दुसरे नाव आहे मंजुळे यांच्या सैराट, फँड्री, न्यूड, अंधाधूंद, झुंड, गंगुबाई काठियावाड, रेडू यासह अनेक चित्रपटात अभिनय केलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदम म्हणजे आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारं एक नाव. मात्र ती देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती.