पुणेसिटी अपडेट्स

हॉटेल व्यावसायिकांनी पुण्याची खाद्यसंस्कृती जपली

मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन

पुणे : कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यावसायिकांची खूप मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली होती. शहराचा प्रथम नागरिक या नात्याने मी या हॉटेल व्यावसायिकांच्या पाठीशी उभा राहिलो होतो. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हॉटेल व्यावसायिकांचे झाले होते. हॉटेल व्यावसायिकांनी सामान्य नागरिकांना त्या कठीण काळात मदत केली. कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांवर आंदोलनामुळे दाखल करण्यात आलेले गुन्हे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून माघारी घ्यायची विनंती करेन. कोरोनाच्या काळात पुण्याची खाद्यसंस्कृती जपण्याचे काम हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे, असे प्रतिपादन मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. निमित्त होते हॉटेल व्यावसायिकांना एकत्र करणारी युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशनच्या पुण्यातील पहिल्या वार्षिक बैठकीचे.

कोरोनाच्या काळानंतर हॉटेल व्यावसायिकांची पहिली बैठक उत्साहात पार पडली. यामध्ये भविष्यात मोठमोठी आव्हाने हॉटेल व्यावसायिकांवर येतील, मात्र हॉटेल व्यावसायिकांनी घाबरून न जाता खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभे राहिले पाहिजे. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांनी त्यांची एकी कायम ठेवली पाहिजे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.
— फत्तेचंद रांका उद्योजक

बैठकीला मा. महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक फत्तेचंद रांका, महेंद्र पितालिया, असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष ॲड. अजिंंक्य शिंदे, असोसिएशनचे सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी, माहुवा नारायण, राहुल रामनाथ, ॲड. अजिंंक्य उडाने आदी उपस्थित होते. तसेच अभिनेता सुनील शेट्टीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे उपस्थिती लावली. याप्रसंगी हॉटेल व्यावसायिकांनी भविष्यात येणारी आव्हाने ओळखून उपाययोजना कराव्यात. या व्यवसायात टिकून राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे महेंद्र पितालिया म्हणाले. तर ‘ही संस्था आम्ही दोन वर्षांपूर्वी पाच लोकांनी सुरू केली होती. आत्ता या संस्थेमध्ये ७०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे, महाराष्ट्र आणि भारतातून दोनशेहून जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. भविष्यकाळात आमचे एक स्वतःचे ॲप येणार आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना त्यावर इत्थंंभूत माहिती मिळेल. आम्ही आपत्कालीन निधी उभारणार आहोत, असे मत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये