ताज्या बातम्यारणधुमाळी

“राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता…”, एकनाथ खडसेंची राज्यसरकारवर टीका

मुंबई | Eknath Khadse On Shinde Fadnavis Governmaet – एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. यामुळे अनेक कामं रखडली आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे वाहून गेली आहे मात्र, असंवेदनशील शिंदे सरकार गेली 15 दिवस जेवणावळीतच व्यस्त असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

औरंगाबाद, उस्मानाबाद नामकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र, शिंदे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करुन स्वत: क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्या भरवश्यावरच राज्य सुरु आहे आणि जनता वाऱ्यावर असल्याची टीका खडसेंनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील जनतेशी काही नसल्याचं दिसून येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जनतेला दिलासा कोण देणार? असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

दरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप वरिष्ठांशी चर्चा झाली नसून ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांचाच विधानपरिषद विरोधी पक्ष नेता असेल, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये