अस्सल, स्वादिष्ट पदार्थांच्या मेजवानीसाठी हॉटेल जय भवानी

जकाल प्रत्येकाला काही ना काही चविष्ट पदार्थ खायची चव सुटली की, खवय्ये बाहेर जाऊन पदार्थांचा आस्वाद घेतातच. तसेच दररोज घरचं जेवण म्हटलं की, प्रत्येकाला कंटाळा येतोच. मग खवय्ये बाहेर एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये जाऊन चविष्ट, चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतातच. तर अशाच हौशी खवय्यांसाठी हॉटेल जय भवानी प्रसिद्ध आहे. हे हॉटेल अगदी कमी काळात खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे.
हॉटेल जय भवानी हे हुसेन मुलाणी यांचं हॉटेल आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या हॉटेलने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. हॉटेल जय भवानी हे व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे हॉटेल शॉप नं. 3, राजमाता भुयारी मार्गाजवळ, दत्तनगर, पुणे-मुंबई बायपास हायवे, कात्रज, पुणे येथे आहे. हॉटेल जय भवानीमध्ये फक्त पुण्यातूनच नाही तर बाहेरून पुण्यात येणारे खवय्ये देखील मोठ्या प्रमाणात तेथील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
हॉटेल जय भवानीची शेवभाजी, दाल राईस, दाल खिचडी, अंडा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, मटन हंडी, चिकन हंडी, चिकन फ्राय, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत. त्याचबरोबर या हॅाटेलमध्ये जेवणासाठी स्वच्छ भाज्या आणि साहित्य वापरून जेवण बनवलं जातं. या हॉटेलने त्यांच्या पदार्थांची चव अस्सल, दर्जेदार ठेवल्याने येथे खवय्ये नेहमी गर्दी करतात. तुम्हालाही स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून हॉटेल जय भवानीला भेट द्या. या हॅाटेलमधील व्हेज-नॅान व्हेज पदार्थांची चव चाखाल तर संतुष्ट होऊन जाल.