ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“समोर दिसणारा रावण गाडण्यासाठी…”, ‘महामोर्चा’मध्ये संजय राऊत कडाडले

मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha – मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीकडून आज (17 डिसेंबर) महामोर्चा (Mahavikas Aghadi Mahamorcha) काढण्यात आला आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी झाले आहेत. या मोर्चादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले, आजचा महामोर्चा सांगतो की महाराष्ट्राच्या जनतेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केलं आहे. या मोर्चानं इशारा दिलाय की शिंदे फडणवीस सरकार, तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? पाहा या मोर्चाकडे. आज दिल्लीही दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र पेटलायय. ही ठिणगी पडली आहे.

आपण समोर दिसणारा रावण गाडण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपली रणनीती ठरली आहे. शंख फुंकलं आहे. आता फक्त ही फौज युद्धासाठी सज्ज करायचयी आहे.जर या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मईला आमच्या ताब्यात द्या, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये