“तू तर एक महिला आहेस…”, एल्विशचा अर्जुनला खोचक टोला; दोघांमध्ये शाब्दिक युद्ध, नेमकं प्रकरण काय?

Elvish Yadav | सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या (Bigg Boss OTT 2) दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच चर्चेत आहे. एल्विश यादवचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तसंच एल्विश बिग बॉस जिंकल्यानंतर चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे.
चर्चेत असलेला एल्विश यादव आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या एल्विश आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर एल्विशने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तो चांगलाच ट्रोल झाला आहे.
अर्जुन बिजलानीनं ट्विटरवर एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यानं महिलांच्या आदराबद्दल भाष्य केलं होतं. अर्जुननं लिहिलं होतं की, “बिग बॉस केल्यानंतर काही लोक आणि त्यांचा फॅन क्लब महिलांचा आदर करणं विसरले आहेत, हे खुप वाईट आहे.” हे ट्विट करत अर्जुनंन कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मात्र, तरीही ही पोस्ट एल्विशच्या मनाला लागली आहे.
अर्जुनच्या ट्विटवर एल्विशन प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं अर्जुनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आता मला समजलं की तू एक महिला आहेस.” एल्विशच्या या प्रतिक्रियेनंतर त्याला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. तर नेटकऱ्यांनी अर्जुनला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे.