प्रांताधिकाऱ्यांनीच केले भुखंडावर अतिक्रमण

पाटील यांचा आरोप; न्याय मिळत नसल्याने दांम्पत्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी मागितली
पंढरपूर | सांगली येथील सुनिल पाटील यांच्या जागेवर पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी अतिक्रमण केले आहे.या बाबत शासकिय कार्यालयात हेलपाटे मारून न्याय मिळत नसल्याने पाटील दांम्पत्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटून निवेदन देवून आत्मदहन करण्याची परवानगी दयावी अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सांगली येथील रहिवाशी सुनिल पाटील यांनी जुने माळी चित्र मंदिर मागील बाजूस सन २००६ साली दोन गुंठे जमीन खरेदी केली होती. पाटील यांच्या शेजारी रहाणारे व सध्या पंढरपूर येथे प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गजानन गुरव यांनी पाटील यांच्या पूर्व बाजूस असलेल्या ३०० स्वेटर फूटावर अतिक्रमण केले आहे.याची माहिती होताच पाटील यांनी या बाबत सांगली महापालीका,पोलीस ठाणे,तहसिल कार्यालय आंदी ठिकाणी तक्रार केली. मात्र गुरव हे प्रांत अधिकारी असल्याने पाटील यांना न्याय मिळाला नाही.शासकिय कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. बरेच महिने हेलपाटे मारून न्याय मिळत नसल्याने पाटील यांच्या पत्नी सारिका यांनी महापालीकेत जावून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही.यामुळे सुनिल पाटील यांनी कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनिलफुलारी यांची भेट घेउन न्याय मिळावा नाहीतर आम्ही पती पत्नीस आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी.प्रांत अधिकारी गजानन गुरव यांची चौकशी करण्यात येवून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासकिय अधिकारीच अतिक्रमण करीत असल्याने या बाबत वेग वेगळी चर्चा होत आहे.
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी रचलेली कुभांडे उघडकीस येऊ लागली !
नगरपालिका, प्रांत कार्यालय, भक्त निवास हॉटस्पॉट?
शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या मालमत्तेवरती टाच त्यातून स्वतःच्या मालमत्ता किंवा थेट रक्कम घेण्याचे काही प्रकार गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर मध्ये उघडकीस येत आहेत महावीर नगर मधील प्लॉट संदर्भात मुख्याधिकारी यांच्यावर पूर्वीपासून संशय होताच प्रकरण उघडके झाल्यानंतर तो संशय खरा ठरला प्रांताधिकारी गजानन गुरव हे पहिल्यापासूनच वादग्रस्त व्यक्तिमत्व होते सचिन डोले यांच्या दैदी प्रमाण शुभ्र धवन कारकीर्दीनंतर एकदम गुरव यांचे कारकीर्द ही पंढरपूरकरांना अतिजासाची आणि भ्रष्टाचाराची वाटतच होते त्यात त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी देखील झाल्या अशाच पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास मध्ये देखील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने बैठक आहोत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि मालमत्तांचे जागा खरेदी विक्रीचे विषय होत असतात याबाबतच्या तक्रारी देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत गेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे.